फेकलीस दूर दूर वापरून माणसे;
राहिली न ती अजून सावरून माणसे.
घासतोस तू कपाळ रोज पत्थरावरी;
पावला कुणास देव ठोकरून माणसे.
ठेवण्या करून कैद रूप लोचनी तुझे;
पाहतात वाट जीव अंथरून माणसे.
जीभ राहिली कुणा,न कान राहिले कुणा;
टाकलीस काय छान कातरून माणसे.
नाव ते तुझेच घेत रोखतात बंदुका;
सोडतात धर्म-राज घाबरून माणसे.
.................................................
(देशोन्नती दिवाळी २००९)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा