५.१२.०९

कुणाशी घेतला पंगा मला सांगा

कुणाशी घेतला पंगा,मला सांगा
कशासाठी सुरू दंगा, मला सांगा.

तहानेने घसा जळतो सजीवांचा
कुणी ही चोरली गंगा, मला सांगा.

पणाला लावली अब्रू सभेने ह्या;
कधी येणार श्रीरंगा, मला सांगा.

कळेना त्या सफारीला कथा तुमची;
तुम्हावाणीच मी नंगा, मला सांगा.

इथे जर पेटले नाही कुठे काही;
झळा का झोंबती अंगा, मला सांगा.



(प्रसिद्धी : ‘अनुष्टुभ’ दिवाळी ०९)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: