१३.२.०९

झेलून घेत थुंकी फळतात फूलझाडे

झेलून घेत थुंकी फळतात फूलझाडे;
का मोडक्या घराला छळतात राजवाडे. 

पोथीत पेरती हे संदेश लाचखाऊ;
आत्म्यास राहण्याचे हे मागतात भाडे.

भिंती चतूर त्यांच्या सांभाळती तिजो-या;
पाहून माणसाला ती लागती कवाडे.

जिद्दीत काल ज्यांनी वस्ती उजाड केली;
गावात त्याच जाता होतात हे नवाडे.

केले जरी खुलासे त्यांनी पवित्रतेचे;
आतून बाटलेली असतात सर्व हाडे.

प्रचिती अगाध ज्यांच्या नाठाळ कुंपणांची;
ते हेच सर्वसाक्षी साक्षात कोंडवाडे.
-----------------------------------------
('अस्मितादर्श'1980)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: