सुगंधाच्या तराजूने फुलांना तोलतो आता;
हवा ही बोलकी झाली हवेशी बोलतो आता.
मला हा एकदा जेव्हा दिला आधार शब्दांनी;
बघा आकाश ता-यांचे कसा मी तोलतो आता.
जयांना स्पर्शण्या भीती सदा वाटेल डोळ्यांना;
अशा अस्पृश्य अश्रूंची तिजोरी खोलतो आता.
फुलांनी घाव केलेले किती गोंजारतो मित्रा;
अरे काळीज माझे मी नखाने सोलतो आता.
अशी ही कोणती मदिरा दिली पाजून मृत्यूने;
उभा हा जन्म झिंगूनी खुशीने डोलतो आता.
■ लेखन : १३ ऑगस्ट १९८३
■ लेखन : १३ ऑगस्ट १९८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा