७.९.०८

दुःख मासे देव झाले


दुःख माझे देव झाले शब्द झाले प्रार्थना
संगीत : गायक : गझलगंधर्व सुधाकर कदम





दुःख माझे देव झाले,शब्द झाले प्रार्थना;
आरती जी गात आहे तीच माझी वेदना.

मी पुजारी माणसांचा,दुःखितांचा भक्त मी;
आंधळ्यांना वाट दावी तीच माझी अर्चना.

रोज देव्हा-यात आत्मा सांजवाती लावतो;
रोमरोमी जाळणारी ज्योत आहे यातना.

दुःख माझे एक राधा,एक मीरा आणखी;
व्याकुळांच्या गोकुळी मी करु कशाची वंचना?

हुंदक्याचे फूल काढी अंतरंगी स्वस्तिके;
आज दिंडी आसवांची येत आहे लोचना.
-----------------------------------------------
('लोकमत' 12 ऑगस्ट 1984)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: