३०.८.०८

खाणीत कोळशांच्या मी शोधतो हि ऱ्याला

खाणीत कोळशांच्या मी शोधतो हि ऱ्याला;
पॉलीश स्टीलची ही प्रत्येक चेहऱ्याला !

शेवाळल्या नद्या अन झाले गढूळ पाणी;
आता तहान माझी सांगू कशी झ-याला?

चौफेर नांदणारे माहेर दहशतीचे;
जावे कुण्या ठिकाणी निर्धास्त आस-याला?

ऐकून शुभ्र ख्याती येऊ नका बघाया;
बंबाळ घाण येते ह्या सभ्य कोप-याला.

जखमेस न्याय आता सांगा कसा मिळावा?
सामील रक्त झाले निर्ढावल्या सु-याला!
---------------------------------------------------
('दऊत लेखणी' वर्धापन 1982)

1 टिप्पणी:

जेडी म्हणाले...

मला मी थोडासा कवी वाटायचो पण आपल्या गजल वाचल्यावर मला भाषेचा अजून भरपूर प्रवास करायचा आहे हे जाणवून गेले
आपल्या गजल चांगल्या आहेत आणि कदाचित उघड सत्य सांगण्याची गरज नसते
आपल्या हातून असेच उत्तम कार्य घडो
आणि आपल्या साहित्यावरून आम्हा नवीन लेखनाचा प्रयत्न नेहमीच प्रेरणा मिळेल

भारावलेला
जयदीप भोगले