२३.८.०८

व्यथे तू जराशी

व्यथे तू जराशी अता हो शहाणी
संगीत : गायक : दिनेश अर्जुना



व्यथे तू जराशी अता हो शहाणी;
नको आठवू तू पुन्हा ती कहाणी.


नको राख याला म्हणू तू फुलांची;
असे ही प्रियेची सुगंधी निशाणी.


जरा शोध त्याला तुझ्या अंतरी तू;
नको व्यर्थ हिंडू नको त्या ठिकाणी.


जुळे आपली ही अता छान मैत्री;
तुला कान नाही,मलाही न वाणी.


कळेना जगाची कशी रीत आहे;
न ओठात गाणी न डोळ्यात पाणी.


तुझी वाट नाही जगावेगळी रे;
पहा सर्व वाटा मिळाल्या स्मशानी!

------------------------------------------
('लोकदूत' दिवाळी 1985)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: