६.८.०८

पाण्यात बुडविणाऱ्या येथे विशाल नावा

पाण्यात बुडविणाऱ्या येथे विशाल नावा;
जिंकून दाखवा रे त्यांच्यावरील दावा.

गाळातळात येतो आवाज एक ऐका;
त्या हंबरून गाई देतात रे पुरावा.

खोप्यात आग लागे;बघते दुरून पाणी;
गर्भार ज्यात मादी आहे करीत धावा.

चांडाळ चौकडयांनी हे लावलेत फासे;
वेल्हाळ पाखरांनो घ्या ओळखून कावा.

पाहू नका फुलांनो ऐन्यात ह्या बिलोरी;
ऐने असे विषारी घेती रुपास चावा.

रक्तात चेतवूनी तेजाब व्हा शहाणे;
खोटीच शुभ्र चांदी त्यांची कसास लावा.

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

jabbardassssta...