२७.७.०८

लाजू नको फूला रे

लाजू नको फूला रे;
मिटवून पाकळ्या रे.


झाला किती दिसाने,
एकांत आपला रे.


तू मौन घेतले पण
हे बोलती शहारे.


ऐन्यात लोचनांच्या,
न्याहाळ तू तुला रे.


भाषेत पापण्यांचा,
समजून घे इशारे.


विझवून टाक आता,
देहातले निखारे.


■ लेखन : १८ ऑक्टोबर १९८३

२ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

गझल सुंदर आहे. आवडली

dr.shrikrishna raut म्हणाले...

आभारी आहे.