२३.२.०८

वेडेपण हे करू नको

वेडेपण हे करू नको;
विस्तव हाती धरू नको.



प्राण लावला पणास तू;
आता मागे सरू नको.



कुठेच नाही कल्पतरू;
त्याच्यासाठी झुरू नको.



जिकडे तिकडे गाळ इथे;
खोलामध्ये शिरू नको.



रांगोळी जर नकार दे;
रंग गुलाबी भरू नको.


अनुभव शिक्षक असे खरा;
दुसरा कोणी गुरू नको

दु:खाला पर्याय नसे;
उगाच शोधत फिरू नको.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: