२७.२.०८

मोकळ्या हवेत श्वास घ्यावयास पाहिजे

मोकळ्या हवेत श्वास घ्यावयास पाहिजे;
या इथून दूर दूर जावयास पाहिजे.


बैसले घराघरात भ्रष्ट ठाण मांडुनी;
वाचवून मज स्वत:स न्यावयास पाहिजे.


आणले महाग मद्य तो तरी रुसे-फुगे;
पाहुण्यास उष्ण रक्‍त प्यावयास पाहिजे.


मौल्यवान बडबडून सांग काय फायदा;
तूच एक त्यातले करावयास पाहिजे.


ऐकला पिढ्यापिढ्यात तोच यक्षप्रश्न मी;
आज मात्र त्यास जाब द्यावयास पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: