१६.२.०८

दु:ख देखणे तुझे,देखणा वसंत तू


दु:ख देखणे तुझे देखणा वसंत तू
संगीत : गायक : भीमराव पांचाळे



दु:ख देखणे तुझे,देखणा वसंत तू;
घाव सांगतातना आजही पसंत तू.


सोसतात लोक हे लाख यातना पहा;
वागवीत बैसला काय एक खंत तू.


वाटल्यास गाळ तू लपून दोन आसवे;
भाषणा, करू नको मरण शोभिवंत तू.


येथली जमीनही नीट ना कळे तुला;
वाचतोस सारखा काय आसमंत तू.


लोचनात ओतुनी प्राण वाट पाहतो;
आणखी बघू नको फार वेळ अंत तू.


स्वर्ग छान कल्पना,मोक्ष फालतूपणा;
चालला कुठे असा शोधण्या दिगंत तू.

-------------------------------------------
( 'तरुण भारत' 15 जून 1980)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: