गझल सादरीकरण : उभी जिन्दगानी पहाडाप्रमाणे
उभी जिन्दगानी पहाडाप्रमाणे;
तिला लोटतो मी कवाडाप्रमाणे.
तिची आसवेही न होती खरी अन्
तिचे हासणेही लबाडाप्रमाणे.
तुझा हात साधा न हातात माझ्या;
मला भेटली तू घबाडाप्रमाणे.
नको वागवू तू मना,दु:खओझे;
सदा विंचवाच्या बिर्हाडाप्रमाणे.
पुढे काढ छाती, करी उंच माथा;
इथे तू जगावे न भ्याडाप्रमाणे.
जगा वाटला मी तुला गूळ माझा;
मला फेकले तू चिपाडाप्रमाणे.
अरे खोल मातीत रुजवी मुळे तू;
तुला फूल येईल झाडाप्रमाणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा