२.१.०८

हासण्याची दे कला देवा

हासण्याची दे कला देवा;
सोसणे झाले बला देवा.


दोष आहे का तिचा काही;
हाच नाहीना भला देवा!


मान माझी कापली त्याने;
वाटला जो आपला देवा.


रंग तोंडाचा नका पाहू;
भाव जाणा आतला देवा.


मोडले ना ज्यास दु:खाने
तो सुखाने वाकला देवा.


माणसांच्या सावलीने तू
काय होता बाटला देवा?

1 टिप्पणी:

Ganesh D म्हणाले...

congratulations for surpassing the count of 1000.
Wish you more and more progress in new year.