Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts with Thumbnails

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या'जीवनगौरव' पुरस्काराने आणि यू.आर.एल फाउंडेशनच्या 'गझल गौरव' पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा

डाव

नाव आता तिचे तू विचारू नको;
जीव गेल्यावरी बाण मारू नको.


भोवर्‍याने मला छान मुक्‍ती दिली;
प्रेत माझे जळा व्यर्थ तारू नको.माझिया ऐवजी ओठ ज्या चुंबिती;
त्या बटांना गडे दूर सारू नको.धुंद आपापली वेगळी वेगळी:
ह्यास पूजा नको, त्यास दारू नको.पाखरांच्या पहा बैसल्या पंगती;
जहर दाण्यांवरी तू फवारू नको.लाव डावावरी राज्य तू आपले;
द्रौपदीला परी त्यात हारू नको.

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP