१८.१०.२४

* होती कुठे जनाची? उरली नसे मनाची

 होती कुठे जनाची? उरली नसे मनाची ;

ख्याती जगात गेली निर्लज्ज माणसाची.


सिंचन किती करावे शेतात आसवांनी?

बहुतेक माय मेली आताच पावसाची 


देवा, तुला कधी रे वाईट वाटते का

पाहून 'ही ' अवस्था येथील माणसाची


सांभाळले गिअरला पण ब्रेक फेल झाला

जिरली अखेर मस्ती वेगात धावण्याची


उंची हिमालयाची अर्धी कमी करा रे

जाणीव फार छळते आम्हा खुजेपणाची


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: