१४.५.१९

रक्तात वाहणारे आई तुझेच गाणे

रक्तात वाहणारे आई तुझेच गाणे
प्रत्येक पावलावर करते मला शहाणे

शब्दात तूच माझ्या हृदयात तूच माझ्या
प्रत्येक श्वास माझा गातो तुझेच गाणे.

होऊन बाळ वाटे मांडीवरी निजावे
घे एकदा कडेवर मज लेकराप्रमाणे

आई तुझ्या स्वरांनी पिळदार गुंफलेले
आजन्म सोबतीला आई तुझेच गाणे
.
सुखदुःख सांगण्याला उरली कुठे न जागा
शोधू तुला कुठे मी जग हे उदासवाणे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: