६.५.१६

उंच सारखा हवेत उडतो

उंच सारखा हवेत उडतो
मातीला ना पाय टेकतो.

आनंदाची पुडी विकत घे
नुसत्या नोटा काय मोजतो !

प्रेमभावना वाच शहाण्या
व्याकरणाच्या चुका काढतो.

खरे खरे तू सांगत नाही
खोटे खोटे किती हासतो.

संवादाची चव घालवली
जेव्हा तेव्हा वाद घालतो.

घरवालीशी तुझा अबोला
मोबाइलवर किती बोलतो!

संध्या झाली कधी कुणाची ?
दुपार वाया का घालवतो?



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: