Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts with Thumbnails

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या'जीवनगौरव' पुरस्काराने आणि यू.आर.एल फाउंडेशनच्या 'गझल गौरव' पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा

२२.४.१५

जे जे समोर येते स्वीकार सर्व काही

जे जे समोर येते स्वीकार सर्व काही;
नाकारल्यास मित्रा ते दुःख तीव्र होई.

पाठीवरी अपेक्षा,डोक्यावरी समस्या;
अश्रू पुसून ओली झाली असेल बाही.

गर्दी असून रस्ता सुनसान वाटणारा;
पाहू नको तरीही मागे वळून बाई.

दु:खास धर्म नसतो,ना जात वेदनेला;
हे मर्म जाणणारा सर्वज्ञ मानतो मी!

ते यार चार खांदे अन् दोन उष्ण अश्रू;
ही एवढीच होती माझी खरी कमाई.


('मीडिया वाॅच' दिवाळी २०१५)1 comments:

संजय डोंगरे २४ एप्रिल, २०१५ रोजी ७:३८ AM  

सर,
तुमच्या - माझ्या जगण्यातली ऊर्जा ही गझल पेश करते . इतकी जुनी असूनही वर्तमानाला काखीत घेते। ।
सलाम.

लोकप्रिय पोस्ट

Netbhet.com
Blogvani.com

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP