देऊ नको चुकांची तू सात स्पष्टिकरणे;
शंका मनात सतरा घेतात स्पष्टिकरणे.
आजन्म होम जळता तू राहशील बेट्या!
-हा शाप काळजाला देतात स्पष्टिकरणे.
मेंदूस झिंग येता ताबा सुटे जिभेचा,
छळते मनास जे जे,बकतात स्पष्टिकरणे.
तू लावलेस झेंडे शिखरावरी परंतू
का उतरला मनातुन पुसतात स्पष्टिकरणे.
होतो जिवंत तेव्हा चुपचाप बैसली ती;
येतील काय कामी मसणात स्पष्टिकरणे?
(''मीडिया वाॅच' दिवाळी २०१५)
शंका मनात सतरा घेतात स्पष्टिकरणे.
आजन्म होम जळता तू राहशील बेट्या!
-हा शाप काळजाला देतात स्पष्टिकरणे.
मेंदूस झिंग येता ताबा सुटे जिभेचा,
छळते मनास जे जे,बकतात स्पष्टिकरणे.
तू लावलेस झेंडे शिखरावरी परंतू
का उतरला मनातुन पुसतात स्पष्टिकरणे.
होतो जिवंत तेव्हा चुपचाप बैसली ती;
येतील काय कामी मसणात स्पष्टिकरणे?
(''मीडिया वाॅच' दिवाळी २०१५)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा