ऐकून तेच चुटके कंटाळलो कधीचा;
संमेलनास कविते मी कावलो कधीचा!
फोटोस हार माझ्या तू घालतो कशाला?
भक्ता, तुझ्यापुढे तर मी हारलो कधीचा!
खोट्या-ख-यात आता उरला न भेद काही;
निवडू कसे कुणाला,भांबावलो कधीचा!
प्रस्ताव ठेवताना, फुंकून ताक प्यावे;
जाळून ओठ माझे पस्तावलो कधीचा.
येतील दर्शनाला सुंदर,तरूण पोरी;
जोडून पाय दोन्ही मी थांबलो कधीचा!
-श्रीकृष्ण राऊत
17 मार्च 2014
संमेलनास कविते मी कावलो कधीचा!
फोटोस हार माझ्या तू घालतो कशाला?
भक्ता, तुझ्यापुढे तर मी हारलो कधीचा!
खोट्या-ख-यात आता उरला न भेद काही;
निवडू कसे कुणाला,भांबावलो कधीचा!
प्रस्ताव ठेवताना, फुंकून ताक प्यावे;
जाळून ओठ माझे पस्तावलो कधीचा.
येतील दर्शनाला सुंदर,तरूण पोरी;
जोडून पाय दोन्ही मी थांबलो कधीचा!
-श्रीकृष्ण राऊत
17 मार्च 2014
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा