Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts with Thumbnails

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या'जीवनगौरव' पुरस्काराने आणि यू.आर.एल फाउंडेशनच्या 'गझल गौरव' पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा

वनवास


कमी झाला झमेल्यांचा जिवाला त्रास थोडासा;
घडीभर लाभला जेव्हा तुझा सहवास थोडासा.

दिवसभर रोज मरताना तुला येईल तो कामी;
सकाळी ठेव जगण्याचा मनी उल्हास थोडासा.

पुन्हा झाली चुकी माझी, पुन्हा मी फसवल्या गेलो;
पुन्हा झाला जिव्हाळ्याचा मला आभास थोडासा.

कुणाला शोधते भिरभिर नजर ओली असोशीने;
कुणाची वाट पाहे हा अखेरी श्वास थोडासा.

नको वाचू कधी पोथी, नको जाऊस तीर्थाला;
उपाशी लेकरांना तू तुझा दे घास थोडासा.

कुणाला वेढले नाही इथे तू सांग लोच्यांनी;
निमित्ते शोधुनी मित्रा, जरा तू हास थोडासा.

परीक्षा संपली कोठे अरे अद्याप सीतेची;
मला सांगू नको रामा, तुझा वनवास थोडासा.

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP