२.११.०९

अभिप्राय जाणत्यांचा नाही खरा कुठेही


अभिप्राय जाणत्यांचा नाही खरा कुठेही;
प्रोत्साहनात होतो जो बोचरा कुठेही.

येथे परस्परांची या पाठ खाजवाया;
बेट्या नवोदितांना वेठी धरा कुठेही.

वाह्यात कारट्याला शिक्षा करा गुरूजी;
बापास लेक म्हणतो जा!जा! मरा कुठेही!


घोडा मरे उपाशी गवताविना बिचारा;
पण गाढवास मिळतो खा तोबरा कुठेही.

गायी तुला शहाण्या दिसतील लंगड्या त्या;
कळपात कोणत्याही जा वासरा कुठेही!

मैत्री असो कि प्रीती,नाती असो घरोबा
पाहून मतलबाचा घे चेहरा कुठेही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: