Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts with Thumbnails

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या'जीवनगौरव' पुरस्काराने आणि यू.आर.एल फाउंडेशनच्या 'गझल गौरव' पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा

वस्ती


दिसते जरी तुम्हाला ही फार छान वस्ती;
सेंटेंड माणसांची भलतीच घाण वस्ती.

प्राणापल्याड जपते निवडुंग जागजागी
अन् टाकते फुलांची मोडून मान वस्ती.

भुलतात मार्ग दिवसा, पडतात रोज चकवे;
थडग्यातल्या घरांनी केली स्मश्मान वस्ती.

भन्नाट हे जिणे पण बेतीव वादळांचे;
पेल्यातले जणू हे आहे तुफान वस्ती.

यांच्या करामतींना नाही अशक्य काही;
पोरीस अर्धकच्च्या आणेल न्हाण वस्ती.

खाऊन थुंकणारी, थुंकून चाटणारी;
नाही जगात कोठे ऐसी महान वस्ती.

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP