Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts with Thumbnails

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या'जीवनगौरव' पुरस्काराने आणि यू.आर.एल फाउंडेशनच्या 'गझल गौरव' पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा

रक्त

गो-या तुझ्या रुपाने भलती कमाल केली;
बघण्यास आरशाला दृष्टी बहाल केली.

तू फूल मागण्याला थोडा उशीर केला;
ओसाड बाग त्यांनी नुकतीच काल केली.

अंधार जीवनाचा तेव्हा प्रसन्न झाला-
जाळून जीव माझा जेव्हा मशाल केली.

रेड्यास रोज देण्या उपसून ज्ञानगंगा;
त्याच्याच कातडीची आम्ही पखाल केली.

संन्यास घेतल्याने बाहेर जिंकलो पण
आतून वासनांनी हळुवार चाल केली.

हाती भविष्य ज्याच्या,काळास त्या नमावे;
मांडून कुंडलीला तू चूक काल केली.

समजू नकोस पडला पाऊस कुंकवाचा;
मी रक्त शिंपडोनी ही वाट लाल केली.
----------------------------------------------
('तरुण भारत' दिवाळी 1984)

■ लेखन : २५ डिसेंबर १९८३

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP