२२.९.०८

पापण्यांनी खोल केले

पापण्यांनी खोल केले वार तू


संगीत : गायक : प्रा. हर्षवर्धन मानकर




पापण्यांनी खोल केले वार तू;
सात माझे जन्म केले ठार तू.

मोहराया लागता काया तुझी;
यौवनाचे मानले आभार तू.

ह्या फुलांनी मान खाली घातली;
कोणता केला असा शृंगार तू?

सर्व साच्यातून गेलो येथल्या;
जीवनाला दे नवा आकार तू.

काल जेव्हा तोल जाऊ लागला;
लाजण्याचा घेतला आधार तू.

हासुनी तू प्राण माझा घेतला;
चुंबुनी केले किती सत्कार तू!
------------------------------------
('तरुण भारत' 1983)

■ लेखन : १६ नोव्हेंबर १९८३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: