Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts with Thumbnails

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या'जीवनगौरव' पुरस्काराने आणि यू.आर.एल फाउंडेशनच्या 'गझल गौरव' पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा

चवदार तळ्याचे पाणी

पेटले तुझ्या स्पर्शाने चवदार तळ्याचे पाणी;
धगधगत्या संघर्षाने शब्दांना फुटली वाणी.


फाटक्या घरांच्या वस्त्या छावण्या छळाच्या होत्या;
मोडली गुलामगिरीची तू जुल्मी प्रथा पुराणी.


अबलांच्या पाठीमागे कायदा उभा तू केला;
शिवलेल्या ओठांवर मग हक्कांची आली गाणी.


रामाने काळ्या तेव्हा दारास उघडले होते;
जेव्हा तू समतेसाठी धडधडला तोफेवाणी.(पूर्वप्रसिद्धी : ‘अस्मितादर्श’ धम्मदीक्षा सुवर्ण महोत्सवी विशेषांक २००६)

2 comments:

अनामित,  ११ जुलै, २०११ रोजी ७:०२ PM  

बोथट तलवारीला पुन्हा धार आली.जयभिम.

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP