९.३.०८

कपाळावरी हात मारुनी बसली चिंता

कपाळावरी हात मारुनी बसली चिंता;
चिंतेमध्ये मला एकदा दिसली चिंता.

फ्लॅट ,फोन अन् गाडी झाली बेमानीने;
उद्या इमानी मुलास माझ्या कसली चिंता?

चूल विझवुनी युद्ध पेटले होते जेव्हा;
घासलेटच्या रांगेमध्ये घुसली चिंता.

सौंदर्यांच्या,अध्यात्माच्या वा मद्याच्या-
प्रलोभनाला कधीच नाही फसली चिंता.

एकांताच्या कुशीत सगळे विदुषक रडती;
सर्कशीस ह्या विषण्णतेने हसली चिंता.

केली होती जरी परीक्षा गर्भजलाची;
चौथ्यानेही मुलगी होउन डसली चिंता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: