प्रश्न दारी घरी सावळी सावळी;
कोण आहे तरी सावळी सावळी?
चारचौघीतली एक साधीसुधी;
ना कुणी ती परी सावळी सावळी.
पाहतो रोज मी शेकडो चेहरे;
त्यात वाटे बरी सावळी सावळी.
माळ हाती नसे घेतली मी जरी;
नाम ओठांवरी सावळी सावळी.
पाहता पाहता कृष्ण वेडावला;
राधिका बावरी सावळी सावळी.
लाव छातीस तू कान देवा जरा;
ऐक माझ्या उरी सावळी सावळी.
कोण आहे तरी सावळी सावळी?
चारचौघीतली एक साधीसुधी;
ना कुणी ती परी सावळी सावळी.
पाहतो रोज मी शेकडो चेहरे;
त्यात वाटे बरी सावळी सावळी.
माळ हाती नसे घेतली मी जरी;
नाम ओठांवरी सावळी सावळी.
पाहता पाहता कृष्ण वेडावला;
राधिका बावरी सावळी सावळी.
लाव छातीस तू कान देवा जरा;
ऐक माझ्या उरी सावळी सावळी.