Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts with Thumbnails

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या'जीवनगौरव' पुरस्काराने आणि यू.आर.एल फाउंडेशनच्या 'गझल गौरव' पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा

६.११.०७

माझी गझल मराठी

साधी,सरल मराठी;
माझी गझल मराठी.

लावून घे कसोटी;
सोने असल मराठी.

ओलीत अमृताचे;
पाटात जल मराठी.

पिकला मळा तुक्याचा;
डोले फसल मराठी.

येवोत काळलाटा;
आहे सबल मराठी.

ब्रह्मांड-‘नेट’ जिंकू;
मारू मजल मराठी.

(असंग्रहीत/ प्रसिध्दी : ‘सकाळ’ दिवाळी अंक २००७)

लोकप्रिय पोस्ट

Netbhet.com
Blogvani.com

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP