१८.१०.२४

* बिनकामाची किती काळजी

बिनकामाची किती काळजी ;

ह्याची-त्याची किती काळजी !


फिकीर कर तू जरा स्वतःची

भक्तगणाची किती काळजी !


मुले-बायको घरात दुःखी;

अध्यात्माची किती काळजी !


मुखात नाही दात विठोबा,

नैवेद्याची किती काळजी!


मुद्दल बुडले ; चिंता नाही

पण व्याजाची किती काळजी !


नकटे झाले नाक नटीचे

सौंदर्याची किती काळजी!


आचरणाची पर्वा नाही;

व्याकरणाची किती काळजी ! 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: