तू वागतो कशाला देवादिकाप्रमाणे

तू वागतो कशाला देवादिकाप्रमाणे;


साध्याच माणसांचे आहे तुझे घराणे.ती नोट काय कामी, जी फाटते कुठेही;


सांभाळ आपले तू कलदार एक नाणे.घे काळजी थव्याची;विसरू नको पिलांना;


चोचीत घाल त्यांच्या तू दोनचार दाणे.सौख्यात लोळणारा आहे पगार मोठा;


कां वाटते तरीपण येथे उदासवाणे?राजीखुशीत नाचे लग्नात प्रेयसीच्या;


तो प्रेमवीर त्याची तकलीफ तोच जाणे!पोटापुढे कधीही लाजू नकोस राजा;


बिनधास्त खात जावे थोडे तरी फुटाणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: