Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts with Thumbnails

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या'जीवनगौरव' पुरस्काराने आणि यू.आर.एल फाउंडेशनच्या 'गझल गौरव' पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा

पुन्हा भेट होणे नसावी कदाचित

पुन्हा भेट होणे नसावी कदाचित
असावी तिची हीच मर्जी कदाचित
.
जिथे तोतयांची भरे रोज जत्रा
तिथे दैवतेही दुतोंडी कदाचित
.
तुम्हाला बनवते खुळा जी कधीही
तिचे नाव आहे प्रसिद्धी कदाचित
.
तुला मुक्त केले तुझ्या मालकाने
तुला गोड वाटे गुलामी कदाचित
.
उभा काळ होता मला न्यावयाला
तुझी आड आली भलाई कदाचित
.
अहंकार नाही मला कोणताही
असे मीच मोठा निगर्वी कदाचित !

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP