Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts with Thumbnails

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या'जीवनगौरव' पुरस्काराने आणि यू.आर.एल फाउंडेशनच्या 'गझल गौरव' पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा

माह्या जिवाले वाटते


तुह्या डोयात बसावं माह्या जिवाले वाटते;
तथी घरटं बांधावं माह्या जिवाले वाटते.

तोंड लपवण्यासाठी मले नाही कुठी जागा;
तुह्या मनात लपावं माह्या जिवाले वाटते.

तुह्या मुचूक जगणं वाटे जह्यराची पुडी;
तुह्या संगंच मरावं माह्या जिवाले वाटते.

माह्या मनातलं गूज कसं मोठ्यानं मी बोलू;
तुह्या कानात सांगावं माह्या जिवाले वाटते.

माह्या नावापुढे मले लावू वाटे तुहं नाव;
तुहं नाव मिरवावं माह्या जिवाले वाटते.

____________________________

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP