३.१०.०७

समर्पणाची पूर्ण तयारी प्रेम मागते

समर्पणाची पूर्ण तयारी प्रेम मागते
संगीत : आनंद मोडक 
गायक : ऋषिकेश रानडे



समर्पणाची पूर्ण तयारी प्रेम मागते
संगीत : आनंद मोडक 
गायक : ऋषिकेश रानडे
चित्रपट : ज्ञानगंगेचा भगीरथ


समर्पणाची पूर्ण तयारी प्रेम मागते;
मीपण अवघे किंमत भारी प्रेम मागते.

झोप सुखाची, चैन जिवाची, खुशी मनाची;
अशी आपली दौलत सारी प्रेम मागते.

आनंदाचे देणे-घेणे करते नगदी;
आठवणींची किती उधारी प्रेम मागते!

कधी रातच्या विलायचीला नाही म्हणते;
कधी दुपारी पान सुपारी प्रेम मागते.

शेजेवरती सांगे ताबा घरी रुक्मिणी;
कोणी वेडी मीरा दारी प्रेम मागते.

(असंग्रहीत/प्रसिद्धी : ‘कविता-रती’दिवाळी अंक २००४)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: