५.१०.०७

तिचा शब्द माझ्या भिडे काळजाला


तिचा शब्द माझ्या भिडे काळजाला;
तुटे जीव माझा कळू दे रमाला.

जरी पत्र सांगे मुलांची खुशाली,
तरी चैन काही पडे ना जिवाला.

तिच्या कंठण्याची कुठे सांग सीमा;
कुठे अंत आहे तिच्या सोसण्याला.

इथे दूर देशी मला आच लागे;
उभे दु:ख तेथे तिला जाळण्याला.

तिच्या काळजीने कधी खिन्न होतो,
परी वेळ नाही मला थांबण्याला.


(असंग्रहीत/प्रसिद्धी: ‘अस्मितादर्श’
धम्मदीक्षा सुवर्ण महोत्सवी विशेषांक २००६)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: