दिली सर्व देणी तुझी जीवना मी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दिली सर्व देणी तुझी जीवना मी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

दिली सर्व देणी तुझी जीवना मी

दिली सर्व देणी तुझी जीवना मी;
सुखाने मराया अता मोकळा मी!

नका दोष देऊ मला चौकशांनो;
जिथे माल होता तिथे ठेवला मी.

निकाली निघाल्या किती आत्महत्या;
विचारू कुणाला खरा आकडा मी?

समाचार सांगू कसा तारकांचा;
मला माफ कर तू न त्या गावचा मी.

पुरे कौतुके कापराच्या वडीची;
उभा जन्म माझा स्वतः जाळला मी.

(''मीडिया वाॅच' दिवाळी २०१५)