जगात जोवर जर-तर कायम
जगण्यासाठी मर-मर कायम
वरवर नुसती गळाभेट ही
दोघांमधले अंतर कायम
जन्माला ना पुरते आई
स्वतःस बेटा सावर कायम
किती पिढ्यांचे अश्रू प्याला
खारट झाला सागर कायम
वाटेमधला दगड कृपाळू
स्मरते त्याची ठोकर कायम
सदा मागते भलतेसलते
बंड मनाचे आवर कायम
श्रीकृष्णाचे ऐक रावणा
राहत नसते पॉवर कायम
( देशोन्नती दिवाळी २२ )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा