"प्रिय श्रीकृष्ण राऊत,गझला वाचल्या. आवडल्या. तुम्हाला गझलरचनेची नस सापडली आहे.अभिनन्दन.तुमचा- पु.ल. देशपांडे,३एप्रिल,१९८९ '' ................................................... * स. न.वि.वि.आपला काव्यसंग्रह मिळाला. फार आभारी आहे. गझल प्रकारावर आपले चांगले प्रभुत्व आहे.कविता आशयसंपन्न,हृद्य आहे.धन्यवाद. - वि.वा.शिरवाडकर, २०/९/१९८९ *
काल जेव्हा तुझी भेट झाली
रात्र तेव्हा दुपारीच आली
खूप होते पहारे तरीही
चंद्र आला नभातून खाली
ऊन टाकीत होते दुपारी
चांदण्याचा सडा भोवताली
मौन होते जरी ओठ तेव्हा
बोलणाऱ्या मुक्या हालचाली
काल पाऊस आला फुलांचा
प्रीत माझी सुगंधात न्हाली.
टिप्पणी पोस्ट करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा