आणखी फुगणे फुग्याला शक्य नाही
बैल होणे बेडकाला शक्य नाही
आवडीने पोसतो अंधार खाली
सूर्य होणे त्या दिव्याला शक्य नाही
एक साधा थेंब कोणी पीत नाही
गोड होणे सागराला शक्य नाही
मानतो जो मीच मोठा,तुच्छ सारे
थोर होणे त्या जिवाला शक्य नाही
घातल्या ज्याने स्वतःला स्वर्णबेड्या
मुक्त होणे मनगटाला शक्य नाही
व्हायचे वाईट याहुन काय आता
माय वागवणे मुलाला शक्य नाही
खंजिराने जीभ त्याची छाटली पण
मूक होणे शायराला शक्य नाही
बैल होणे बेडकाला शक्य नाही
आवडीने पोसतो अंधार खाली
सूर्य होणे त्या दिव्याला शक्य नाही
एक साधा थेंब कोणी पीत नाही
गोड होणे सागराला शक्य नाही
मानतो जो मीच मोठा,तुच्छ सारे
थोर होणे त्या जिवाला शक्य नाही
घातल्या ज्याने स्वतःला स्वर्णबेड्या
मुक्त होणे मनगटाला शक्य नाही
व्हायचे वाईट याहुन काय आता
माय वागवणे मुलाला शक्य नाही
खंजिराने जीभ त्याची छाटली पण
मूक होणे शायराला शक्य नाही
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा