पेज

१८.१०.२४

* वाट माझी अशी लागली शेवटी

वाट माझी अशी लागली शेवटी

लाज माझी मला वाटली शेवटी


शोधले मी जिला रोज गुत्त्यामधे

तीच शांती मला भेटली शेवटी


लालसा पूर्ण झाल्या कधी  माणसा,

एक इच्छा नवी वारली शेवटी


घास घासातला रोज ज्यांना  दिला

तीच तोंडे मला चावली शेवटी.


वासनेला दिली तू जगा,  मान्यता

छान राखी तिने बांधली शेवटी


जन्म अवघा सुगंधात न्हाला तिचा

अत्तराची कुपी सांडली शेवटी



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा