मनाला सारखी डसते जगाची रीत उरफाटी
मलमपट्टी वरुन करते जगाची रीत उरफाटी
तिला ठाऊक आहे की स्वभावाला दवा नाही
तरी शोधीत का फिरते जगाची रीत उरफाटी
प्रसादाला न तीर्थाला तुला जी बोलवत नाही
तुझ्यावर आरती रचते जगाची रीत उरफाटी
तुझ्यावर प्रेम करण्याची जरी ती भोगते शिक्षा
तुझ्यावर का तरी मरते जगाची रीत उरफाटी
किती ही बोलते आता तुझ्या निर्जीव फोटोशी
अबोला जन्मभर धरते जगाची रीत उरफाटी
जिता आहेस जोवर तू दखल घेणार ना कोणी
कदर मेल्यावरी करते जगाची रीत उरफाटी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा