पेज

२३.१०.२१

दडपणे दूर ही सारा, जरासा श्वास घेऊ द्या

दडपणे दूर ही साराजरासा श्वास घेऊ द्या;

नका बांधू कुणी वारा,जरासा श्वास घेऊ द्या.

जिवाची काहिली होते गुलाबाच्या,चमेलीच्या;
जरासे ऊन नाकाराजरासा श्वास घेऊ द्या.

असे अवतार तुमचा रेनसे तो रेसचा घोडा;
कधी नापास स्वीकारा,जरासा श्वास घेऊ द्या.

उभे आयुष्य काट्याच्या अणीवर काढले त्यांनी,
मुखावर वाजले बारा,जरासा श्वास घेऊ द्या.

कधी तर चोपडी फेका नफा-नुकसान नोंदीची;
करा त्या बंद व्यापाराजरासा श्वास घेऊ द्या.

जिथे चौरंग सोन्याचा,छतालाही जिथे चांदी;
सदा तो बंद गाभारा,जरासा श्वास घेऊ द्या.

असे जे मूळ दु:खाचे,असे कारण वितुष्टाचे-
अपेक्षांचा नको माराजरासा श्वास घेऊ द्या.
_________________________
  ('कविता-रती' दिवाळी 2010)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा