जितेपणी उपवास किती ?
मेल्यावरती घास किती !
काळेबेरे झाकाया
झगमगती आरास किती !
नवीन राजा अवतरला,
पुन्हा जन्मले दास किती !
कला शीक तू जगण्याची
मोजत बसला श्वास किती
गर्भ राहिला पुरुषांना
तिचे बोलणे 'खास' किती !
विकून खाऊ लाजशरम
करो कुणी उपहास किती !
जगू लाग तू डोक्याने
मनास होतो त्रास किती .
किती भेटते गझल खरी
अन् गझलेचे भास किती !
मेल्यावरती घास किती !
काळेबेरे झाकाया
झगमगती आरास किती !
नवीन राजा अवतरला,
पुन्हा जन्मले दास किती !
कला शीक तू जगण्याची
मोजत बसला श्वास किती
गर्भ राहिला पुरुषांना
तिचे बोलणे 'खास' किती !
विकून खाऊ लाजशरम
करो कुणी उपहास किती !
जगू लाग तू डोक्याने
मनास होतो त्रास किती .
किती भेटते गझल खरी
अन् गझलेचे भास किती !
( अक्षरवेध दिवाळी २१ )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा