२८.५.१८

स्वतःला मेलो इतकं सुतकी राहू नये कधी

स्वतःला मेलो इतकं सुतकी राहू नये कधी
व्यथेच्या ऐनेमहालात प्रिया पाहू नये कधी
.
येणार असते चांदणी अनाहूत अंधारात
निखळत्या उल्केच्या वाटेला जाऊ नये कधी
.
हरेक ओठांना चुंबित नसते रे गझल
खुशालीत तिच्या तिला गाऊ नये कधी
.
उमलत्या फुलांचे आहे निर्माल्य ठरलेले
उगाच दोष उन्हाला लावू नये कधी
.
आपसुक रंगत जाते मेंदी रक्तात पेटून
स्वतःच्या खांद्यावर चितेला वाहू नये कधी
.

('युगवाणी 'ऑगष्ट -सप्टेबर ७८)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: