असे जीवना तू किती घात केले;
मला तू खरेदी लिलावात केले.
किती झाकल्या मी व्यथा अंतरीच्या;
उगा स्पष्ट त्यांना खुलाशात केले.
तुला सांग दुःखा कसा मित्र मानू?
हवे तेवढे तू न आघात केले.
तुला एक साधे कमळ दे म्हणालो;
किती खून तू या तलावात केले.
पुरे खंडले रे अखंडत्व माझे;
किती खंड माझे नकाशात केले.
तुला शोभले का अरे ईश्वरा हे-
भिका-याप्रमाणे पुढे हात केले.
1 टिप्पणी:
वा सर खूप छान......ही गजल मला मनापासून आवडली.........
टिप्पणी पोस्ट करा