११.१०.०८

आसवांची कशी रीत आहे

आसवांची कशी रीत आहे
संगीत : गायक : दिनेश अर्जुना




आसवांची कशी रीत आहे;
आग पाणीच लावीत आहे.

घाव माझ्या उरातील बोले;
ऐकणारा म्हणे गीत आहे.

सांग बोलू कसा मी तुझ्याशी;
शब्द ओठास चावीत आहे.

फूल ज्वालांवरी झोपले जे;
नाव त्याचेच का प्रीत आहे?

पाजण्याची त-हा कोणती ही-
एक प्याला मला पीत आहे!
---------------------------------
('लोकमत' 1983)

■ लेखन : २८ ऑक्टोबर १९८३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: