बुद्धीबळास अपुल्या लागेल चाल हाती.
आहे विचार अमुचा झाडास भेट द्यावी;
येथील माणसांची काढून साल हाती.
जाळून आसवांनी हे टाकलेत डोळे;
जागीच राख झाला तेव्हा रुमाल हाती.
हे दुःख झेलतांना झालो विराट इतका;
पृथ्वीस तोलतो मी आता खुशाल हाती.
नाजूक फार सध्या आहेस रे दिव्या तू;
पेलेल का तुला ही जळती मशाल हाती.
--------------------------------------------
('दृष्टी' दिवाळी 1983)
■ लेखन : ६ जुलै १९८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा