पेज

७.६.०८

वळणावरून तूही जाशील दूर राणी

वळणावरून तूही जाशील दूर राणी;
होईल फूल माझे निर्माल्य त्या ठिकाणी.


छ्ळतील जीवनाला एकांत जीवघेणे;
होतील दंश लाखो एकेक आठवांनी.


चन्द्राविना नभाच्या रुसतील हाय रात्री;
काढून घेत जावी समजूत तारकांनी.


डोळयांत दीप माझ्या जळतील भावनांचे;
ती आग पापण्यांना लागेल आसवांनी.


सुकुमार काळजाचा पेटेल रोज वणवा;
होईल राख तेव्हा माझी तुझी कहाणी.

---------------------------------------------
('तरुण भारत' 28 जुलै 1985)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा