मीठन् मिरच्या लावुन त्यांना चाटू का मी ?
कविता-फविता गझला- बिझला खाऊ का मी ?
रंग-ढंग मी तुझे झेलले पोरांसाठी
उरलेसुरले सांग कपाळी गोंदू का मी ?
असेल मोठे नाव तुझे रे ; काय फायदा ?
करून त्याची भाजी-पोळी जेवू का मी ?
दांड घातला, गाठि मारल्या, विरली साडी
मासोळीचे जाळे झाले, नेसू का मी ?
संसाराचा केला विचका हाताने तू
उगाच त्याचा दोष नशीबा लावू का मी ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा